आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगाखेड शुगर घोटाळा: गुट्टेंची सीआयडी चौकशी; गृह राज्यमंत्री केसरकर यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गंगाखेड शुगर अँड एनर्जी फॅक्टरीच्या पीक कर्ज घोटाळ्यातील मुख्य आरोपी रत्नाकर गुट्टे यांची सीआयडी चौकशी करणार असल्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.  

आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचना करत ‘गंगाखेड’च्या संचालक आणि बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. सुनील केदार यांनी गुट्टे याला मंत्रालयातून संरक्षण मिळत असल्याची शंका उपस्थित करत त्याच्याविरोधात ‘मोका’अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. गुट्टे यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले आहेत. ही मालमत्ता जप्त न केल्यास पथकातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही ताकीद न्यायालयाने दिली आहे.

शेतकऱ्यांच्या नावे उचलले कर्ज 
‘शेतकऱ्यांच्या नावे कर्ज देताना रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार केवायसीची पूर्तता केलेली नाही.  एकाही प्रकरणात २० टक्के ‘मार्जिन मनी’ घेतलेला नाही. तसेच कर्ज दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या बचत खात्यात रक्कम जमा करून पुन्हा खातेदारांच्या परवानगीविना ‘गंगाखेड’च्या खात्यात जमा करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...