आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडीत नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार, तिघे संशयित ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक छायाचित्र)
मुंबई- आठ दिवसांपूर्वीच भिवंडीत राहायला आलेल्या एका 19 वर्षीय नवविवाहितेवर रविवारच्या मध्यरात्री सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साध्या पत्र्याच्या घरात राहणा-या या महिलेच्या घरात घुसून पतीसमोरच त्या नराधमांनी अत्याचार केला. यानंतर मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिनेही लुटून नेले आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
भिवंडीतील मीठपाडा येथील दत्ताशास्त्री चाळीतील घरात पीडित महिला व तिचा पती आणि सासरा झोपलेले असताना तीन अनोळखी नराधमांनी घराच्या दरवाजाची कडी वाजवून त्यांना झोपेतून उठवले. दरवाजा उघडताच या तिघांनी महिलेच्या पतीला व सास-याला घरातून बाहेर काढले. त्यानंतर तिच्या अत्याचार केला. याचबोरबर पळून जाताना महिलेच्या अंगावरील 15 हजारांच्या दागिने लुटले.

पळून जाताना चाळीतील इतर घरांचे कडेकोयंडे बाहेरून लावून घेतले. या घटनेने घाबरलेल्या या पीडित महिलेच्या कुटुंबियांनी शेजा-यांच्या मदतीने भिवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अखेर रविवारी रात्री निजामपूर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेवर आयजीएम उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भिवंडीत गेल्या 15 दिवसांत चोरीच्या सुमारे 16 घटना घडल्या आहेत आणि या बलात्काराने भिवंडीतल्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.