आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत अल्पवयीन मुलीवर चौघांकडून गँगरेप; तिघांना अटक, एक फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- खरेदी केलेले कपडे परत देण्यास आजीने सांगितल्याने रागातून घराबाहेर पडलेल्या चौदा वर्षांच्या मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना धारावी येथे घडली. याप्रकरणी दिनेश यादव, सलमान खान आणि राजकुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर उमेश कवडे हा फरार झाला आहे.
याबाबतची माहिती अशी की, मरोळ येथे राहणा-या पीडित मुलीचा आजीसोबत 24 मे रोजी वाद झाला होता. त्यामुळे ती घर सोडून जम्मू- काश्मीर येथील मित्राला भेटण्यासाठी कुर्ला रेल्वेस्थानकावर आली. या वेळी दिनेश यादव (20) व उमेश कवाडे (19) यांनी तिला आताच्या गाडीचे तिकीट नसल्याचे कारण देत आपल्या घरी नेले. दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला.
राजकुमार (20) आणि सलमान खान (20) या आपल्या दोन मित्रांना त्यांनी फोन करून बोलावून घेतले. त्यांनीही तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर उमेश मुलीला सोडण्यासाठी जात असताना झाकीर खान या व्यक्तीने त्याला हटकले. त्या वेळी मुलीने झालेला प्रकार त्यांना सांगितला. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, तर एक जण फरार झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...