आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगस्टर अबू सालेम हत्या प्रकरणात दोषी, टाडा कोर्टात आज शिक्षेवर युक्तिवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बिल्डर प्रदीप जैन यांच्या १९९५ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने सोमवारी गँगस्टर अबू सालेम आणि इतर दोघांना दोषी ठरवले. याच प्रकरणात २००५ मध्ये त्याचे पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करण्यात आले होते. सालेमला प्रथमच एखाद्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. मंगळवारी शिक्षेवर युक्तिवाद होईल.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, अबू सालेमला भादंवि कलम ३०२ (हत्या) आणि १२० ब (गुन्हेगारी कट) नुसार तसेच टाडाच्या कलमांनुसार दोषी ठरवण्यात आले आहे. सालेमचा ड्रायव्हर मेहंदी हसन आणि बिल्डर वीरेंद्र जांब यांनाही दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला होता. हल्लेखोरांनी मार्च १९९५ मध्ये जैन यांना गोळी मारली होती. जैन यांच्या मालमत्तेवर कब्जा करण्यासाठी सालेमने त्यांना धमकी दिली होती. दहशत निर्माण करण्यासाठी त्याने जैन यांची हत्या घडवली होती. या प्रकरणातील आरोपी नईम खान आणि रियाझ सिद्दीकी सरकारी साक्षीदार झाले आहेत. खटला २००८ मध्ये सुरू झाला होता. सालेमविरुद्ध १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटासह आठ खटले सुरू आहेत.