आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत घरोघरी हा गँगस्टर विकायचा दूध; दाऊदनंतर मुंबईवर केले होते राज्‍य, वाचा फॅक्ट्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कुख्‍यात डॉन अरुण गवळी 80 आणि 90 च्‍या दहशकात मुंबईतील भायखळा या स्‍लम एरियात राहून घरोघरी दूध पोहोचवण्याचे काम करत होता. पुढे आपल्या क्रुर कृत्यामुळे तो गुन्हेगारी जगताचा बादशाह झाला. आता 'डॅडी' या नावाने त्‍याची ओळख असून, नागपूरच्‍या कारागृहात शिवसेनेच्‍या नगरसेवकाच्‍या खुन प्रकरणात तो शिक्षा भोगत आहे. एक सामान्‍य कुटुंबातील मुलगा ते अंडरवर्ड डॉन या त्‍याच्‍या प्रवासाविषयी divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी ही खास माहिती...

गवळीचे वडील आले होते मुंबईत मध्यप्रदेशातून
मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून अरुण गवळीचे वडील गुलाबराव रोजगारासाठी मुंबईत आले होते. घरातील आर्थिक स्थिती ठीक नसल्याने अरूण गवळीला पाचवीतूनच शाळा सोडावी लागली. यानंतर वडिलांना मदत म्हणून तो घरोघरी जाऊन दूध विकण्याचा काम करू लागला. 1980 च्या दरम्यान गवळी राम नाईक गॅंगशी जोडला गेला. पुढे दाऊदसाठी तो काम करू लागला.

दाऊद दुबईत पळून गेल्यावर गवळीचे एकतर्फी राज
1993 मध्ये जेव्हा मायानगरी मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा तेव्हा अंडरवर्ल्डचे सारे समीकरण बदलून गेले होते. बॉम्बस्फोटाच्या आधीच दाऊद दुबईला पळून गेला. दाऊद आणि छोटा राजन वेगवेगळे झाले. छोटा राजनने आपला मलेशियात व्यवसाय सुरू केला. त्यामुळे अरुण गवळीला मुंबईत आपले साम्राज्य उभे करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला गवळीचा कारभार दगडी चाळीतून चालत असे. दरम्यान, त्याला शेकडो गुंड येऊन मिळाले व तोही अट्टल गुन्हेगार बनला.

पुढील स्‍लाइडवर वाचा... गवळीच्या परवानगीसाठी पोलिस थांबायचे
बिल्डर आणि व्यावसायिक घ्यायचे गवळीची मदत
महिला पत्रकाराला मारहाण केल्याने साळसकरांनी चोपले होते गवळीला
15 दिवसाच्या आत साळसकरांनी गवळीच्या तीन गुंडांचा केला होता खात्मा
पोलिसांच्या भीतीने राजकारणात केला प्रवेश
एन्काउंटर स्पेशालिस्टने संपविली गवळीची गॅंग
बातम्या आणखी आहेत...