आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत लोकलच्या धडकेत गँगस्टरच्या मुलाचा मृत्यू; मद्यधुंदावस्थेत ओलांडत होता रेल्वे ट्रॅक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवडी रेल्वे स्थानकाजवळ सापडलेला मृतदेह अंडरवर्ल्ड गँगस्टर चंद्रकांत चोडपे याचा मुलगा गीतेशचा होता. तो मद्यधुंद अवस्थेत रेल्वे रुळ ओलांडताना लोकल खाली येऊन त्याचा मृत्यू झाल्याचे जीआरपींनी सांगितले आहे.

मिळालेली माहिती अशी की, गीतेश चोपडे (32) याचा मृतदेह 15 दिवसांपूर्वी शिवडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर सापडला होता. गीतेश हा गोल्डन गँगचा म्होरक्या चंद्रकांत चोपडेचा मुलगा होता. लोअर परेलमधील सन मिल कम्पाऊंडमध्ये गँगस्टर चंद्रकांतचा अड्डा असल्याचे म्हटले जाते. हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार सारख्या बड्या गँगस्टर्ससाठी तो काम करत होता.

आत्महत्या आहे, अपघात की घातपात?
3 ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास गीतेशचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडला होता. अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. ही आत्महत्या आहे, अपघात की घातपात, याबाबतही पोलिस तपास करत होते.

दारु घ्यायला गेलेला गीतेश परत आलाच नाही..
गीतेश खूप दारु प्यायला होता. तो आणखी दारु आणण्यासाठी गेला परंतु परत आला नाही, अशी माहिती गीतेशसोबत दारु पित बसलेल्या मित्राने दिली आहे.  त्यामुळे गीतेश मद्यधुंद अवस्थेत रेल्वे रुळ ओलांडताना त्याला लोकलने धडक दिल्याचे तपासात स्पष्‍ट झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...