आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला मुंबईकरांनी दिला उत्साहात निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई बाप्पांनानिरोप देण्यासाठी अवघी मुंबईनगरी नटली होती. विसर्जनाची व्यवस्था पाहण्यासाठी पालिकेचे दीड हजार कर्मचारी आज चौपाटी तसेच इतर विसर्जन स्थळांवर तैनात करण्यात आले होते. तसेच, विसर्जन सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून ३५ हजार पोलिस तैनात करण्यात आले होते.
गिरगाव चौपाटीवर या वर्षी १३ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्याचा अंदाज असून, किनाऱ्यावरील वाळूमध्ये वाहन अडकून पडू नये यासाठी दोनशेहून अधिक लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मुंबईतील महापौर बंगल्यातील कृत्रिम तलावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरच्या गणपतीचे विसर्जन केले.
चौपाट्यांवरील सायंकाळ गणेशभक्‍तांच्‍या गर्दीने फुलून निघाली. लाडक्‍या गणरायाच्‍या विसर्जनासाठी सकाळपासून मुंबईकरांची गर्दी आहे. ढोल ताशांच्‍या गजरात भाविकांनी गणपती बाप्‍पाला निरोप दिला. घरगुती गणपतींचे विसर्जन सकाळपासून सुरु झाले. मुंबईचा राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरु झाली. गणेशगल्ली ते आयकर भवन एवढे अंतर कापायला तब्बल दोन तास लागले. मुंबईच्या प्रमुख तीन गणपती मंडळांचे गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर इतर मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. शहरात एकूण 7 हजार 213 मोठी गणेश मंडळे आहेत. दरम्‍यान, अनुचित प्रकारावर लक्ष ठेवण्‍यासाठी तटरक्षक दल गिरगाव चौपाटीवर हेलिकॉप्टरने गस्त घालत होते.
मुख्‍यमंत्र्यांनी चौपाटीवर घेतले दर्शन
मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरगार चौपाटीवर सुरक्षेचा आढावा घेतला. त्‍यांच्‍या हस्‍ते गणेश मंडळांचे स्‍वागत करण्‍यात आले. शिवाय राजकीय क्षेत्रातील मान्‍यवरांनीही येथे उपस्‍थिती दर्शवली.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुंबईतील गणपतींची विसर्जन मिरवणूक