आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Garment Mill Shifted In Maharathwada From Mumbai

मुंबईतील कापड गिरण्यांचे मराठवाड्यात स्थलांतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या आठ कापड गिरण्या कापूस उत्पादक जिल्ह्यांत म्हणजे मराठवाडा-विदर्भात स्थलांतरित करण्यात येणार असून त्यासाठी फडणवीस सरकारने सोमवारी एका संनियंत्रण समितीची स्थापना केली. कापूस उत्पादक जिल्ह्यांत या कापड गिरण्यांचे स्थलांतर होणार असल्याने विदर्भ-मराठवाड्यातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. स्थलांतरांच्या काही जागा निश्चित झाल्या असून अमरावती, नांदगाव पेठ यांचा त्यामध्ये समावेश आहे.

आघाडी शासनाचे वस्त्रोद्योग धोरण मोडीत काढून भाजप सरकार नव्याने धोरण तयार करत आहे. त्यासाठी सुरेश हाळवणकर समिती नेमण्यात आली होती. या समितीने अहवाल नुकताच सादर केला. हाळवणकर समितीच्या अहवालात राज्यातील कापसावर राज्यातच प्रक्रिया करण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्य सरकार पावले टाकत असून मुंबईत वस्त्रोद्योग विभागाच्या बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या आठ गिरण्या कापूस उत्पादक जिल्ह्यात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.