आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील टिळकनगरमध्ये घरगुती गॅसचा स्फोट, 1 ठार, 15 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: स्फोटात घराची झालेली अवस्था)
मुंबई- मुंबईतील चेंबूरमधील टिळकनगर भागात आज सकाळी एका घरात घरगुती गॅसचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. तर, सुमारे 15 जण जखमी झाले आहेत. यात 9 महिलांचा तर 3 पुरुषांचा तर काही लहान मुलांचा समावेश आहे. यातील तीन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
टिळकनगरमधील पी.एल. लोखंडे मार्गावरील संदीप कॉलनीतील एका चाळीतील 10 X 10 च्या छोट्याशा घरात हा स्फोट झाला आहे. या स्फोटात महेश जगताप या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 9 महिलासह 3 पुरूष व तेवढीच लहान मुले जखमी झाले आहेत. यात तीन महिलांची स्थिती गंभीर असून, सर्व जखमींवर घाटकोपर येथील राजावाडी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. ही घटना चाळीत घडल्याने आसपासच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच चाळीतील रहिवाशांत यामुळे भितीचे वातावरण आहे.