आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gas Cylinder Blast In Dombivali MIDC Chem Star Company

डोंबिवलीत केमस्टार कंपनीत गॅस सिलिंडरचा स्फोट; एक ठार, चार जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डोंबिवली एमआयडीसीतील केमस्टार कंपनीला सोमवारी पहाटे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत एक कर्मचार्‍याचा होरपळून मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अग्निशामन दलाच्या सहा गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. केमस्टार ही कॉस्मेटीक्स उत्पादक कंपनी कंपनी आहे. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूराचे लोट पसरल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते.