आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gas Tanker Slip At Dahanu On Highway, Two Died, 10 Injured

डहाणूत हायवेवर गॅस टॅंकर उलटून स्फोट झाल्याने मोठी आग; 7 जण ठार झाल्याची भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई-अहमदाबाद हायवेवर डहाणूजवळ एक गॅसचा टॅंकर उलटून अपघात झाला. यात गॅसचा स्फोट होऊन टॅंकर आगीच्या भस्मस्थानी पडला. त्यामुळे टॅंकरला मोठी आग लागली आहे. डहाणूजवळील चारोटी नाक्यावर ही घटना घडली आहे.
या घटनेत एका मुलीसह 7 जण गंभीर जखमी झाले असून, 7 जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच 8 गाड्याही जळून खाक झाल्या आहेत. आग मोठी असल्याने दोन्ही बाजूंनी हायवेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, खबरदारी म्हणून 100 मीटरवरच गाड्या थांबवल्या गेल्या आहेत. दरम्यान, वाहनांच्या गर्दीमुळे अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचू शकल्या नाहीत. त्यामुळे एका तास होऊन गेला तरी आगीवर नियत्रंण मिळवणे अवघड झाले होते. अखेर दीड तासांनी आग विझविण्यात यश आले.