आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेल होणार येत्या तिमाहीत 5 ते 8 % महाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने येत्या महिन्यापासून कच्च्या तेलाचे (क्रूड) उत्पादन कपातीचा निर्णय घेतला आहे. यामुळे तीन-चार महिन्यांत पेट्रोल-डिझेलचे दर ५ ते ८ टक्क्यांनी वाढू शकतात, असे क्रिसिलने अहवालात म्हटले आहे.
मुंबईत सध्या पेट्रोल ७२.४६ रु. प्रति लिटर आहे. ब्रेंट क्रूडची किंमत ५०-५५ डॉलर प्रति पिंपापर्यंत राहिल्यास पेट्रोल ७५ रुपयांपर्यंत जाऊ शकते. क्रिसिलनुसार क्रूड ६० डॉलरपर्यंत गेल्यास पेट्रोलचे दर ८० व डिझेलचे दर ६८ रुपयांपर्यंत जाऊ शकतात. भाव घसरल्याने ओपेक देशांनी उत्पादन कपातीचा निर्णय घेतला आहे.
सोनेही घसरणार

सोने ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. दिल्लीत भाव २८,८०० रु. प्रति १० ग्रॅम होता.अमेरिकेत या आठवड्यात व्याजदर वाढल्यास देशात सोने २७,००० रुपयांवर येऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...