आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेटवे लिटफेस्टमध्ये प्रादेशिक साहित्याला मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाच्या एलआयसी गेटवे लिटफेस्टचे आयोजन मुंबईतील एनसीपीए थिएटरमध्ये २० आणि २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. यामध्ये १५ भाषांमधील ७० लेखक सहभागी हाेणार असून ‘समकालीन प्रादेशिक साहित्याची स्थिती’ असा यंदाच्या लिटफेस्टचा मुख्य केंद्रबिंदू आहे. मराठीतील भालचंद्र नेमाडे, हिंदी कवी केदारनाथ सिंग, ओडिया लेखक प्रतिभा रायंड आणि सीताकांत महापात्रा असे चार ज्ञानपीठ विजेते लेखक सहभागी असणार आहेत.
प्रादेशिक साहित्याला इंग्रजीइतकाच सन्मान मिळावा, भारतातील विविध भाषांतील लेखकांना राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन िमळावे, इंग्रजी साहित्य व प्रादेशिक साहित्य यांचे सहअस्तित्व जपले जावे यासाठी मुंबईत २०१५ पासून गेटवे िलटफेस्टचे आयाेजन करण्यात येत आहे. मुंबईतील मल्याळम पब्लिकेशन काक्का आणि कम्युनिकेशन एजन्सी पॅशन फाॅर कम्युनिकेशन (पी फाॅर सी) या लिटफेस्टचे मुख्य आयोजक आहेत.
यंदाच्या लिटफेस्टमध्ये सात प्रादेशिक भाषांवर मुख्य भर असणार आहे. मराठी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओरिया व तामीळ यांमधील साहित्यविषयक चर्चेसाठी या महोत्सवात विशेष सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

गेटवे िलटफेस्टचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. मागच्या वर्षी गुजराती कवी सीतांशु यशचंद्र, सुबोध सरकार (बंगाल), लीना मनिनाकलई (तामीळ), गोविंद निहलानी, बेन्यामिन (केरळ), हेमंत दिवटे, सतीश सोलांकुरकर (महाराष्ट्र), अभिनेत्री-दिग्दर्शक नंदिता दास, सचिन केतकर (गुजरात), कुरिप्पुझा श्रीकुमार, कल्पेट्टा नारायण, व्ही.
आर. सुधीश, मानसी (केरळ) सहभागी झाले होते.

Á
फेब्रुवारी २० ते २१ रोजी ‘एनसीपीए’मध्ये आयोजन
Á
१५ भाषांतील ७० लेखकांचा जमणार मेळा
Á
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त चार लेखकांची उपस्थिती
सोशल मीडियावर होणार चर्चा
दोन दिवसांच्या महोत्सवात चित्रपटातील वास्तव जीवन आणि कल्पनाविश्व यांचा संबंध, इंग्रजी भाषेची भारतीय पुराणकथांमधील व्याप्ती, फेसबुक व व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडियाचा भारतीय कवी व काव्यावर होणारा परिणाम, प्रादेशिक महिला लेखिका आणि मुख्य प्रवाहातील साहित्य विश्वापासून त्यांची विलगता, मराठी साहित्यातील साठी ते नव्वदीच्या दशकापर्यंतचे ट्रेंड आणि भाषांतरामुळे साहित्याचे कमी होत चाललेले महत्त्व यावर मुख्य चर्चा होणार आहे.