आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेटवे ऑफ इंडिया, ताज, विमानतळावर हायअलर्ट : दहशतवादी हल्ल्याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज स्थानिक व आंतरराष्ट्रीय विमानतळ, गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी फोनवरून मिळाल्यानंतर या भागात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, तपासयंत्रणांनी येथील सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे.
नोव्हेंबर २००८ मध्ये ताज हॉटेललाच दहशतवाद्यांनी लक्ष्य बनवले होते. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीदरम्यान विमानतळाच्या कंट्रोल रूमला विशेष कुमार नामक एका व्यक्तीने फोन करून ही माहिती दिली. २६/११ पेक्षाही मोठा दहशतवादी हल्ला करण्याची काही व्यक्ती योजना आखत होते. तसेच, मुंबईतील दोन्ही विमानतळ, गेट वे ऑफ इंडिया तसेच ताज हॉटेल स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने उडवून देण्याची ते चर्चा करत असल्याचा दावा विशेष कुमार यांनी केला आहे. दरम्यान पोलिस उपायुक्त मोहन दहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती प्राप्त होताच तीनही ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मात्र, त्यात आपत्तीजनक काहीच आढळून आले नाही.

विशेष म्हणजे, ३० सप्टेंबर रोजी ७/११ साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. त्याच दिवशी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर मुंबईत येऊन "आयएनएस कोच्ची' ही युद्धनौका राष्ट्राला समर्पित करणार आहेत.