आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gay Boss Offerd Sex Relation With Driver, He Made Suicide

\'गे\' बॉसचा सेक्ससाठी दबाव वाढताच मुंबईतील ड्रायव्हरने केली आत्महत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मायानगरी मुंबईतील एका ड्रायव्हरला आपल्या बॉससोबत शारीरिक संबंध नाकारणे चांगलेच महागात पडले. सिंगापूरमधील केलविन नावाच्या आपल्या बॉ़सशी शारिरीक संबंध नकार दिल्याने व त्याबाबतची माहिती मित्रांना झाल्यामुळे लज्जित झालेल्या या ड्रायव्हरने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.

याबाबतची घटना अशी की, विजय कोलू नावाचा एक मुंबईतील तरुण सिंगापूरमधील नागरिक केलविन सोअ या व्यक्तीच्या दिल्‍लीतील ऑफिसमध्ये काम करत असे. विजयची के‍लविनसोबत भेट अंधेरीतील एका हॉटेलमध्ये झाली होती. तेव्हा विजय तेथे वेटर म्हणून काम करत होता. त्यावेळी केलविन विजयवर फिदा झाला. केलविनने विजयला चांगला पगार देऊ केला व दिल्लीत येण्यास सांगितले. त्यानुसार विजय दिल्लीत केलविनकडे नोकरीसाठी गेला. त्यावेळी केलविनने विजयला दिल्लीत आपल्याच घरी राहण्यास सांगितले. त्यानंतर केलविनने विजयला आपल्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी सुरु केली. काही दिवसांनी या गोष्टींना वैतागून अखेर विजय नोकरी सोडून परत मुंबईला परत आला.

जानेवारीत केलविन मुंबईत आला. त्यावेळी त्याने विजयची समजूत घातली. दरम्यान त्याआधी विजयच्या सांगण्यावरुन त्याचा मित्र मनीषलाही केलविनकडे नोकरीला लावले होते. केलविन मुंबईत आला होता. दरम्यान, मनिषही केलबिनसोबत मुंबईत आला होता. मनिष आणि केलविन एका हॉटेल उतरले होते.
दरम्यान, मनिषने आपल्या मित्रांना हॉटेलमध्ये बोलवून पार्टी दिली. विजयलाही बोलावले होते. तसेच या पार्टीचे व हॉटेलचे बिल केलविन देणार होता. तेथे सर्वांनी भरपूर प्याली. विजय दारु प्याला नाही. त्यावेळी दारुच्या नशेत तर्र झालेल्या मनीषने आपल्या मित्रांना सांगितले की, केलविन समलैंगिक आहे व त्याच्यासोबत मी शारीरिक संबंध ठेवले आहेत. त्यावेळी केलविनही तेथेच होता मात्र, त्याला मराठी वजा हिंदी समजत नव्हती. तसेच विजयच्या बाबतीतही असाच प्रसंग घडल्याचे त्याने सांगितले. विजयला अशीच ऑफर देण्यात आली, त्यामुळे विजय नोकरी सोडून मुंबईत आला, असे मनिषने आपल्या मित्रांना दारुच्या नशेत सांगितले. यामुळे लज्जित झालेल्या विजयने 14 जानेवारीला घरात आत्महत्या केली.