आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gazatted Officers Give Theri Two Days Salary To Drouth Hit People

राजपत्रित अधिकारी देणार दुष्काळग्रस्तांसाठी दोन दिवसांचा पगार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सरकारी डॉक्टरांनी एक दिवसाचा पगार जाहीर केल्या पाठोपाठ राजपत्रित अधिकारीदेखील दुष्काळग्रस्तांसाठी दोन दिवसांचा पगार देणार आहेत. राजपत्रित अधिकारी संघाचे सरचिटणीस ग.दि. कुलथे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. मार्च व एप्रिल महिन्यातील प्रत्येकी एक दिवसाचे वेतन दिले जाईल. यातून सुमारे 25 ते 30 कोटी रुपये जमा होतील. या वेळी निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, पाच दिवसांचा आठवडा सुरू करावा, अशा मागण्या महासंघाचे अध्यक्ष रवींद्र धोंगडे यांनी मांडल्या.