आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गे रेव्ह पार्टी उधळली; 31 जणांना अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ड्रग्ज व मद्याच्या नशेत सुरू असलेल्या गे रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी 31 जणांना अटक केली. शुक्रवारी रात्री ओशिवरा येथे एका पबमध्ये ही पार्टी सुरू होती. अटक झालेल्या आरोपींमध्ये एका र्जमनसह अमेरिकन व्यक्तीचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खबर्‍याने एसएमएसद्वारे या पबमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे अनेक तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. पार्टीत अनेक गे जोडपे असल्याचेही निदर्शनास आले. पार्टीत मोठय़ा प्रमाणात विदेशी मद्य, ड्रग्जचाही वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वेळी पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज तसेच विदेशी मद्य जप्त केले असून अटक करण्यात आलेल्या सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.