आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजरामर \'गीत रामायणा\'चा हीरकमहोत्सव साजरा होणार, मार्चमध्ये पुण्यात आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या प्रतिभेचा आविष्कार असणाऱ्या 'गीत रामायणा'स यंदा 60 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त पुण्यात 26 ते 28 मार्चदरम्यान षष्ठ्यब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. गीत रामायणातील अन्य भाषांत अनुवादित झालेली गीतेही या वेळी सादर करण्यात येणार आहेत.

प्रसिद्ध संगीतकार-गायक आणि सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके यांनी ही माहिती दिली. भारतीय शिक्षण मंडळ (पश्चिम महाराष्ट्र)चे सचिव धनंजय कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. 'गीत रामायणा'च्या निर्मितीस 60 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसांत श्रीधर फडके स्वत: रोज 10 ते 12 गीते सादर करतील. तर इतर भाषांतील गीत रामायण गीते त्या भाषेतील गायक सादर करणार आहेत. गीत रामायणाचे अनुवाद हिंदी, कन्नड, गुजराती, बंगाली, तेलुगू संस्कृतमध्ये झाले आहेत.
गीत रामायणाची वाटचाल- गेल्या 60 वर्षांत गीत रामायणाची जी वाटचाल झाली, त्याची छायाचित्रे, आठवणी, किस्से, माहितीपर गोष्टी प्रसंगांचे संकलन, मान्यवरांच्या मुलाखती तसेच लेखांची विशेष स्मरणिकाही प्रकाशित केली जाणार आहे. तसेच नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची समितीही नेमण्यात येणार आहे.