आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय निरुपम यांच्या पत्नीला किरण रावप्रमाणे असुरक्षित वाटते, डॉनने दिली धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी नुकत्याच झालेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आम्हाला भाजप कार्यकर्ते सोशल मीडिया आणि फोन करून अश्लील शिवीगाळ करून धमक्या देत आहेत. त्यामुळे मलाही अभिनेता आमिर खान याची पत्नी किरण राव हिच्याप्रमाणे देशात असुरक्षित वाटत आहे, या आशयाचे पत्र संजय निरुपम यांच्या पत्नी गीता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात गीता म्हणतात, ‘अापला देश भारत हा लोकशाही मानणारा देश आहे. येथे सर्वांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. माझे पती संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत आहे. यावर चर्चा होऊ शकली असती. मात्र, स्वत:ला संस्कारी म्हणून घेणारे भाजप कार्यकर्ते माझ्या ८० वर्षांच्या सासूला यात गोवत आहेत. तसेच आमच्या कुटुंबाविरोधात सर्रास अश्लील भाषा वापरण्यात येत आहे,’अशी तक्रार पत्रात करण्यात अाली अाहे.

गीता यांनी पंतप्रधानांना उद्देशून म्हटले, ‘तुमच्या एखाद्या वक्तव्याबद्दल तुमची आई किंवा पत्नीला धमकी दिल्यास तुम्हाला कसे वाटेल? त्यामुळे मलाही आता देशात असुरक्षित वाटत अाहे,’ असे नमूद करत आपल्या पत्राचे उत्तर देण्याची विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे.

डाॅन रवी पुजारीने दिली धमकी
सर्जिकल स्ट्राइकबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संजय निरुपम यांना अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याने फोन करून धमकी दिली. तसेच सार्वजनिकरीत्या माफी मागावी, असेही त्याने सांगितल्याचे गीता यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...