आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Generic Medicine Use In Municipal Hospital Says Mayor Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेनरिक औषधांसाठी महापौरांचा पुढाकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये महाग औषधाऐवजी स्वस्त जेनरिक औषधे ठेवण्यात यावीत, अशी सूचना करणारे पत्र मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना लिहिले आहे.
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध दुकानांसाठी जागा देण्यात येते. या औषध दुकानांमध्ये महागडी ब्रँडेड औषधे ठेवली जातात. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णांना महागडी औषधे विनाकारण घ्यावी लागतात. पालिकेच्या रूग्णालयांमध्ये जेनरिक औषधे उपलब्ध केल्यास सामान्य नागरीकांना त्याचा मोठा लाभ होईल, अशी मागणी महापौरांनी पत्रामध्ये आयुक्तांकडे केली आहे. हृदयरोग, मधुमेह, किडनीचे विकार, मज्जसंस्थेचे विकार या आजारांवरील औषधांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. महागड्या औषधांना जेनरिक औषधांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. राजस्थान राज्य शासन तेथे या औषधांचा मोठा वापर करत आहे. अभिनेता आमिर खान सादर करत असलेल्या ‘सत्यमेय जयते’ या शोमुळे देशभरात जेनरिक औषधांवर चर्चा सुरू झाली. मुंबई महापालिका रूग्णालयांसाठी दरवर्षी 80 कोटींची रक्कम औषधांसाठी खर्च करत असते. जेनरिक औषधांची योजना मुंबई महापालिकेने अंगीकारल्यास पालिकेच्या खर्चामध्ये मोठी बचत होणार आहे.