आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट : हिमायत बेग याला फाशीऐवजी जन्मठेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / पुणे - सन २०१० मध्ये पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणातील एकमेव दोषी हिमायत बेग याला सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. या प्रकरणात फक्त स्फोटके ठेवल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले असून फाशीऐवजी जन्मठेप सुनावण्यात आली.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी बॉम्बस्‍फोट होऊन १७ लोकांचा मृत्यू झाला होता. या स्फोटांत ५६ लोक गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग (३१, उदगीर) यास स्फोटके ठेवल्याप्रकरणी तसेच कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, या प्रकरणात बेग याच्यावर दाखल गुन्ह्यांपैकी बनावट कागदपत्रे बाळगणे व विस्फोटक बाळगणे या कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला असून इतर गुन्ह्यांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायमूर्ती नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. उच्च न्यायालयाने निकाल दिला तेव्हा हिमायत बेग काळा शर्ट आणि जीन्स अशा वेशात कोर्टात हजर होता.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, हिमायतला पाच कलमान्वये दिली होती फाशीची शिक्षा...
तेव्हा बेग पुण्यात नव्हताच : बचाव पक्ष.... निकालातील मुद्दे पाहावे लागतील...
बेगचा जर्मन बेकरीशी संबंध नाही.... हमारा बेटा बेकसूर है...
बातम्या आणखी आहेत...