आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get Tiger Hang Him Not His Brother Say\'s Salman Khan

वडिलांच्‍या सांगण्‍यावरून सलमानने मागितली माफी; हिंदू सेनेने पुतळा जाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानने फेसबूक फेजवर माफीची केलेली पोस्‍ट - Divya Marathi
सलमानने फेसबूक फेजवर माफीची केलेली पोस्‍ट
मुंबई - बॉलीवुड अभिनेता सलमान खानने 1993 मधील मुंबई बॉम्स्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनला फाशी देण्याचा विरोध केला. सलमानने शनिवारी रात्री उशीरा 49 मिनिटांत एकूण 14 ट्वीट करून याकूबला पाठिंबा दर्शवला. त्याने पहिला ट्विट रात्री 1:52 AM वाजता आणि शेवटचे ट्विट रात्री 2:41 AM वाजता केले. निरापराध्याचा मृत्यू म्हणजे मानवतेची हत्या असल्याचे सलमानने म्हटले आहे. टायगर मेमनच्या गुन्ह्यांची शिक्षा त्याचा भाऊ याकूबला मिळायला नको, असे तो म्हणाला. सलमानने ट्विटमध्ये म्हटले आहे की, टायगरला पकडायला हवे. तो एखाद्या मांजरीप्रमाणे लपून बसलाय आणि आपल्याला एक मांजर पकडता येत नाही. दरम्यान, सलमानच्या या विरोधावर या प्रकरणाशी संबंधित सरकारी वकील उज्ज्वल निकम भडकले आहेत. सलमानवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. दरम्‍यान, हिंदू सेनेने त्‍याचा पुतळा जाळला असून, सलमानने दिलेल्‍या या प्रतिक्रियेचा देशभरातून निषेध केला जात आहे. यामुळे त्‍याच्‍या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. या सगळ्या प्रकारामुळे त्‍याच्‍या वडिलाच्‍या सांगण्‍यावरून सलमान खान याने माफी मा‍‍गितली आहे. शिवाय आपण याकूबला निर्दोष आहे, असे म्‍हटले नाही, असेही त्‍याने स्‍पष्‍ट केले.

मारेकऱ्याबाबत सहानुभुती निर्माण करतोय सलमान : निकम
सरकारी वकील उज्जवल निकमने म्हटले आहे की, सलमानचे वक्तव्य वादग्रस्त आहे. सलमान त्याच्या लोकप्रियतेचा चुकीचा वापर करत असून तो कोणत्या पुराव्यांच्या आधारे असा दावा करत आहे, अशी विचारणा निकम यांनी केली आहे. अशा प्रकारामुळे 257 जणांची हत्या करण्याचा आरोप असणाऱ्याविरुद्ध सहानुभुती निर्माण होऊ शकते. आम्ही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहोत. मला माहिती आहे, अनेक लोक कधी कधी शुद्धीत नसतात. त्यामुळे सलमानला आणखी एक संधी द्यायला हवी, अाता तो ट्विट मागे घेतो की, नाही हे पाहायला हवे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजीद मेनन म्हणाले, लाखो लोक याकूबला फाशी देण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे आता निकम कोणा कोणाच्या विरोधात कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सलमानची शरीफ यांना विनंती
सलमानने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना विनंती करणारे एक ट्विटही केले आहे. त्याने लिहिले, शरीफ साहेब तुम्हाला एक विनंती आहे, जर टायगर तुमच्या देशात असेल तर कृपया सांगा.

सलमान खानने केलेले ट्विट्स
1. हँग टायगर
2. टायगरऐवजी त्याच्या भावाला फाशी दिली जात आहे. अरे... टायगर कुठे आहे?
3-4. भारतात टायगरचीच तर कमतरता आहे, टायगरला घेऊन या. आम्ही तर कुटुंबासाठी प्राणही देऊ. टायगर तुझा भाऊ काही दिवसांत तुझ्यासाठी फासावर जाणार आहे. यावर काही स्टेटमेंट. एखादा पत्ता, काही तर बोल. वा भाऊ असावा तर असा, म्हणजे याकूब मेमन.
5. कोणता टायगर, कसला टाइगर, कुठे आहे टाइगर, काय ठरवून टायगर नाव ठेवले आणि काय समोर आले.
6. एका निरापराध्याची हत्या म्हणजे मानवतेची हत्या आहे.
7. याकूब मेमनबाबत वाचून कमेंट करा.
8. हट
9. टायगरला आणा
10. टायगरला आणून फाशी द्या, केवळ दाखवण्यासाठी त्याच्या भावाला नको.
11. कुठे लपलाय टायगर? हा काही टायगर नाही, मांजर आहे. आणि आपल्याला एक मांजर पकडता येत नाही.
12. शरीफ साहेब एक विनंती आहे की, जर तो तुमच्या देशात असेल, तर कृपया आम्हाला सांगा.
13. तीन दिवसांपासून या दिवसाचा विचार करत होतो. असे करायला घाबरत होतो पण, एका व्यक्तीच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. भावाला फाशीवर लटकवू नका, जो पळून गेलाय त्याला फाशी द्या.
14. कोणीही अद्याप टायगर म्हटले नाही. त्याचा यावर अधिकार नाही. हँग दॅट.... फिल इन द ब्लँक्स

याकूबच्या सपोर्टमध्ये आले अनेक नेते-मुस्लिम धर्मगुरू
सलमान खानशिवाय याकूबच्या फाशीच्या विरोधात अनेक नेते आणि मुस्लिम धर्मगुरुंनीही आवाज उठवला आहे. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी याआधीच याकूबबरोबर भेदभाव झाल्याचा आरोप केला आहे.

बी रमण यांच्या स्टेटमेंटवरून स्पष्ट होते की, याकूबने नेपाळमध्ये सरेंडर केले होते आणि त्याने ISI च्या ऑपरेशनबाबत गुप्तचर संस्थांची मदत केली होती. रॉ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते, त्यानुसार त्याची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करण्यात यावी. - सपा नेते अबू आझमी

याकूबला केसमध्ये प्रॉसिक्यूशनने अनेक महत्त्वाचे मुद्दे कोर्टापासून लपवले आणि कोर्टाची दिशा भरकटवली. जर प्रॉसिक्युशननेच कोर्टात असे म्हटले असते की, मेमनने सरेंडर केले असते तर त्याला बहुधा मृत्यूदंड मिळाला नसता. - परवेज लकडावाला, इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) चे उलेमा

मुंबईत 1992-93 दंगलींच्या दोषींबाबत श्रीकृष्ण कमिशनने काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. जर याकूबला 1993 च्या साखळी स्फोट प्रकरणी फाशी दिली जात असेल तर दंगलीच्या आरोपींना का मोकळे सोडले जात आहे. - मौलाना मेहमूद दरयाबादी, ऑल इंडिया मिली कौन्सिलचे सरचिटणीस

बाबरी मशीद प्रकरण आणि त्यानंतरच्या दंगलींनंतर देशाचा इतिहास बदलला. दंगलग्रस्तांनाही न्याय मिळायला हवा. - मौलाना मुस्तकीन आझमी, जमैतुला उलेमा-ए-हिंद (महाराष्ट्र)

पुढील स्लाइड्सवर वाचा, सलमानच्या ट्विटवर कोण काय म्हणाले...तसेच पाहा सलमान खानच्या ट्विटरवरील पोस्ट..