आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटकोपर दुर्घटनेत सुनील शितप थोडक्यात बचावला; तो बाहेर पडलाच कोसळली इमारत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- घाटकोपर येथे झालेल्या इमारत दुर्घटनेच्या वेळेचे एक CCTV फूटेज व्हायरल झाले आहे. या प्रकरणात दोषी असलेला सुनील शितप हा स्वत: या अपघातातून थोडक्यात बचावल्याचे CCTV फूटेजमधून समोर आले आहे.
 
घाटकोपरमधील 30 वर्षे जुनी 'साईदर्शन' इमारत 25 जुलै रोजी कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता. तळमजल्यावर नर्सिंग होमचे नुतनीकरण करताना सुनील शितपने इमारतीच्या मुख्य खांबांना धक्का लावल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे. ही दुर्घटना घडली त्याच्या अवघ्या पाच मिनिटे आधी शितप या इमारतीतून बाहेर पडला होता. CCTV फूटेजनुसार, तो इमारतीतून बाहेर पडला आणि 10 वाजून 19 मिनिटांनी त्याच्या गाडीत बसून गेला. त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत म्हणजे 10 वाजून 24 मिनिटे झाली असताना ही इमारत कोसळली. 
 
पुढील स्लाईडमध्ये पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...