आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghosekar Couples Dies In Tourist Boat Capsizes In Andaman

अंदमान बोट दुर्घटनेत ठाण्यातील भोसेकर दांपत्याचा मृत्यू, दोन मुले बचावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अंदमान-निकोबारमध्ये काल झालेल्या अॅक्वा मरिना बोट दुर्घटनेत ठाण्यातील चंद्रशेखर भोसेकर व त्यांच्या पत्नी अलका भोसेकर यांचा बुडून मृत्यू झाला आहे. याचबरोबर मुंबईच्या लालजी सिंह यांचाही मृत्यू झाला आहे. मात्र, लालजी सिंह यांच्या पत्नी सुदैवाने वाचल्या आहेत. चंद्रशेखर भोसेकर आपल्या कुटुंबियासह अंदमान-निकोबारला पर्यटनाला गेले होते. ठाण्यातील रोटरी क्बलचे सक्रीय सदस्य असलेले भोसेकर एक बांधकाम व्यावसायिक होते. भोसेकर दांपत्य आपल्या दोन मुलांसह व मुलीसह गेले होते. हे सर्व जण अॅक्वा मरिन बोटीतून प्रवास करीत होते.
25 लोकांच्या क्षमतेच्या बोटीत 45 जण बसले होते. ही बोट तामिळनाडूच्या कांचीपूरम येथून अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरपासून काही किलोमीटरवर असलेल्या व वॉटर स्पोटर्ससाठी प्रसिद्ध असणा-या नॉर्थ बे आयलंडकडे जात होते. त्याचवेळी दुपारी चारच्या सुमारास बोटीच्या मागच्या बाजूने पाणी आता येऊ लागले. त्यामुळे बोटीवरील पर्यटकांचा थरकाप उडाला. सर्वजण मदतीची याचना करीत असतानाच व घाबरलेल्या स्थितीत सर्व जण बोटीत उभे राहिले. त्यातच बोट उलटली व सर्वजण समुद्रात ओढले गेले.
यात 21 प्रवाशांचा मृत्यू झाला तरी तितक्याच पर्यटकांना वाचविण्यात यश आले. भोसेकर दांपत्याचा मृत्यू झाला असला तरी त्यांच्या मुलांना वाचविण्यात यश आले आहे. लालजी सिंह यांचा मृत्यू झाला तरी त्यांच्या पत्नींना वाचविण्यात यश आले. या सर्वांवर पोर्ट ब्लेअरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, मृतांच्या नातेवाईकांना अंदमान-निकोबारचे नायब राज्यपालांनी 1 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.