आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Giants International Award Presented To Rameshchandra Agrawal

रमेशचंद्र अग्रवाल यांना जायंट्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दैनिक भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल यांच्यासह 41 जणांना मंगळवारी रात्री एका विशेष कार्यक्रमात जायंट्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. मीडियाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल अग्रवाल यांचा गौरव करण्यात आला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ट्रायडेंट हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अंबानी उपस्थित होते.

पद्र्मशी नाना चुडासमा यांनी 17 सप्टेंबर 1972 ला जायंट्स इंटरनॅशनलची स्थापना केली होती. या प्रसंगी व्यावसायिक व उद्योजक आनंद महिंद्रा, औषधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रोफेसर जेम्स थॉमस, चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी ऐश्वर्या रॉय बच्चन, समाजसेवेसाठी बच्चूभाई (लक्ष्मीचंद) रामभिया, सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अजय कुमार, संगीत क्षेत्रातील योगदानासाठी गायक सोनू निगम आदींना या समारंभात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या वेळी अंबानी म्हणाले, ‘समाजासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. आव्हानांकडे समस्या म्हणून बघता संधी म्हणून पाहिले पाहिजे, तरच त्यावर मात करता येऊ शकेल. तसेच त्यातूनच भविष्यात भारत जागतिक नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतो. भारत विकसनशील देश असून कुणाला देशाचा विकास पाहायचा असेल तर त्यांनी छोट्या शहरांत तो बघावा.’