आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीस नकार ; मुंबईत अपंग व्यापाऱ्यावर तलवारीने हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - खंडणीस नकार देणाऱ्या एका अपंग व्यापाऱ्यावर सराईत गुंडाने तलवारीने हल्ला केल्याची घटना चेंबूर येथे गुरुवारी उघडकीस आली. दरम्यान, दुकानात खरेदीसाठी आलेल्या एका ग्राहकाने हल्लेखोराला वेळीच राेखल्याने व्यापाऱ्याचे प्राण वाचले. याप्रकरणी अक्रम शेखसह चाैघांना अटक करण्यात अाली.
रजनीश ठाकूर यांचे पी. एल. लोखंडे मार्ग येथे दुकान आहे. या भागातील गुंडांना हप्ते देण्यास त्यांचा विराेध हाेता. त्यांनी इतर व्यापाऱ्यांनाही तसे अावाहन केले हाेते. दरम्यान, मंगळवारी रात्री अक्रमने दुकानात घुसून ठाकूर यांच्यावर तलवारीने हल्ला केला. सुदैवाने एका ग्राहकाने अक्रमला राेखत पिटाळून लावले. ग्राहकाने जखमी अवस्थेत ठाकूर यांना रुग्णालयात नेले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अक्रम याला अटक केली.

त्यांच्या चौकशीत इतर तिघांची नावे समोर आली. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तक्रार करूनही पोलिसांचा कानाडोळा
खंडणी मागणाऱ्या गुंडांची ठाकूर यांनी काही महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, त्यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे याप्रकरणी तक्रार केली होती. मात्र, त्यानंतरही पोलिस थंडच होते. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस उपायुक्त संग्राम सिंग यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.