आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरणी कामगारांचे रणशिंग; आजपासून बेमुदत उपोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘एमएमआरडीए’ने भाड्याने देण्यासाठी बांधलेली घरे गिरणी कामगारांना मालकी हक्काने द्यावीत, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील गिरणी कामगारांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून सुमारे 25 गिरणी कामगार आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची माहिती गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर कामगारांना घरे बांधून दिली जात आहेत. मुंबईत गिरणी कामगारांची संख्या दीड लाखांवर आहे. मात्र, शासनाने केवळ 6 हजार 925 कामगारांनाच सदनिका दिल्या आहेत. ही घरे मोफत असतील, असे शासनाने यापूर्वीच स्पष्ट केले होते; परंतु म्हाडाने बांधलेल्या या घरांसाठी कामगारांना आता साडेसात लाख रुपये मोजावे लागले.