आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरगावमधील चौकाला राजेश खन्ना यांचे नाव!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गिरगावातील एका चाैकाला दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या स्थापत्य समितीत मंजूर करण्यात आला. शिवसेना नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांनी ही माहिती दिली.

राजेश खन्नाचे बालपण गिरगावच्या सरस्वती निवासमध्ये गेले. शिक्षणही ठाकुरद्वारच्या शाळेत झाले. संघर्षाच्या काळातही ते इथेच राहात असत. यशस्वी झाल्यानंतर त्यांनी गिरगाव सोडले, परंतु त्यांचे अनेक चित्रपट गिरगावातील रॉक्सी टाॅकीजमध्ये सुपरहिट झाले. म्हणूनच टाटा रोड क्रमांक एक आणि मामा परमानंद मार्ग जेथे मिळतो त्या चौकाला राजेश खन्ना यांचे नाव देण्याचा प्रस्ताव प्रभाग आणि स्थापत्य समिती मंजुर झाला. आता सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर चौकाचे नामकरण हाेणार अाहे.