आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girish Bapat nawab Malik Blame Game, Bapat Warns, I M Going Court

नवाब मलिकांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार- गिरीश बापटांची दर्पोक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माझ्यावर व्यक्तिगत नाव घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे. मंत्री बापट सध्या नागपूरात आहेत. तेथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला.
राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते असलेल्या नवाब मलिक यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दोन हजार कोटींचा डाळ घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच बापट यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर बापट यांनी मलिक यांना प्रत्त्युत्तर देत आपण त्यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचे जाहीर केले. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांचा मी इन्कार करतो. तसेच राज्य सरकारवर अविश्वास दाखवल्याने त्यांचा मी निषेध करतो. मलिक यांनी माझे नाव घेऊन माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते त्यांनी सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्याविरोधात कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे अशी दर्पोक्ती बापटांनी केली.
मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात रात्री साडे नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन डाळीबाबत माहिती दिली होती. त्याचा धागा पकडून मलिक यांनी बापटांवर जोरदार टीका केली आहे. मलिक म्हणाले, "सरकार रात्री काम करत नाही, रात्री फक्त चोर दरोडेखोर काम करतात. मंत्री गिरीश बापट मात्र धाडीच्या माध्यमातून रात्री दरोडा घालण्याचेच काम करत आहेत. या भ्रष्ट मंत्र्यांची सरकारने तात्काळ हाकालपट्टी करावी," अशी मागणीही मलिक यांनी केली. "रात्री काम करणाऱ्या या मंत्र्यांनी रात्रीच पत्रकार परिषद घेऊन व्यापा-यांना डाळ विकण्याची परवानगी दिली. ती कुठल्या कायद्याखाली दिली याची माहिती वारंवार मागून सरकार देत नाही. डाळीच्या या संपूर्ण प्रकरणात दोन हजार कोटींचा घोटाळा केला. यादरम्यान न शिजणारी डाळ 100 रूपये किलोने विकून भाजप कार्यकर्त्यांनी पैसे कमावले. जर गिरीश बापटांची मंत्रीपदावरून हाकालपट्टी केली नाही, तर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आवाज उठवेल," असा इशाराही मलिक यांनी दिला आहे. त्यामुळे बापटांचे पित्त खवळले आहे.
आणखी काय-काय आरोप केले आहेत नवाब मलिक यांनी बापटांवर, वाचा पुढे...