आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र मुलींवर अत्याचार करणा-या उद्योगपतीचा जामीन कोर्टाने फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- आरोपी उद्योगपतीचा फोटो दाखविताना पीडित तरूणीची आई व खाली स्टिंग केलेल्या व्हिडिओचा अंश)
मुंबई- मुंबईतील कल्याण उपनगरातील एका 17 वर्षीय पीडित तरूणीने गेल्या दोन वर्षापासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाचे (वय 58) स्टिंग ऑपरेशन करीत त्याचे कृत्य जगासमोर आणले आहे. आपल्या आईला सांगूनही तिचा यावर विश्वास बसत नसल्याने तरूणीने हे पाऊल उचलले. अखेर पर्दाफाश झालेल्या आरोपी उद्योगपतीला कल्याणमधील कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने तोही शुक्रवारी फेटाळला.
पीडित तरूणी मुंबईतील एका प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून नुकतीच 12 वी पास झाली आहे. तिच्यावर सावत्र पिता गेली दोन वर्षे लौंगिक अत्याचार करीत आहे. संबंधित तरूणीचे वय सध्या 17 वर्षे असून, तिच्या आईने पहिल्या नव-याला सोडून देत पाच वर्षापासून आरोपी उद्योगपतीसोबत राहत आहे. त्यावेळी महिलेची आणि तिच्या 12 वर्षीय मुलीची राहण्याची व्यवस्था करून दिली. तरूणी 15 वर्षाची ( दोन वर्षापूर्वी) झाल्यापासून आई घरातून बाहेर पडली की हा उद्योगपती तिच्यावर अत्याचार करायचा. पीडित तरुणीने आईला याबाबत माहिती देऊनही ती तिच्याकडे दुर्लक्ष करायची. तरीही आईने संबंधित उद्योगपती पतीला याबाबत एकदा जाब विचारला. मात्र त्याने आरोप नाकारत मुलीवर बंधन घालत असल्याने आरोप केल्याचे महिलेला सांगितले. त्यानंतरही आईला अनेकदा वेगवेगळ्या मार्गाने सांगण्याचा प्रयत्न तरूणीने केला तरीही ती आपल्या मुलीवरच रागावयाची.
सावत्र पित्यामुळे होणारा रोजचा अत्याचार आणि आई विश्वासच ठेवत नसल्याने होणारी घुसमट सहन होत नसल्याने तरूणीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली मात्र, त्या दिवशी तिला आत्महत्या करण्यासाठी एकटीला वेळच मिळाला नाही. उलट ती चिठ्ठी आईला सापडली. त्यामुळे ती अधिक अस्वस्थ होती. अखेर तिने आत्महत्येचा पर्याय मागे ठेवत सावत्र बापाचे कृत्य जगासमोर आणायचे ठरवले. ज्याद्वारे आईचाही विश्वास बसेल व या नराधम बापाला शिक्षा होईल. त्यानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात दुपारी एक दिवस आई बाहेर गेली असताना उद्योगपती तिच्या बेडरूमध्ये गेला. घरात आई नसताना तो अत्याचार करण्यासाठी येणार अशी शक्यता असल्याने तरुणीने आपला मोबाइल चार्ज करण्याच्या बहाण्याने टीव्हीच्या बाजूला सुरू ठेवला. काही वेळातच तो नराधम आला व तिच्यावर अत्याचार करू लागला. इकडे कॅमेरा सर्व रेकॉर्ड करीत होता.
अखेर मुलीने त्या सायंकाळी आपल्या आईला रेकॉर्ड दाखवले व 58 वर्षीय पतीचा चेहरा पीडित तरूणीच्या आईला कळाला. पीडित तरूणीने व तिच्या आईने त्याच रात्री कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्यानंतर संबंधित उद्योगपतीवर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेंस (POSCO) नुसार गुन्हा दाखल करीत त्याला गजाआड केले. सध्या पोलिस कस्ठडीत असलेल्या 58 वर्षीय आरोपीने जामीन मागितला होता. मात्र, स्थानिक कोर्टाने त्याचा जामीन फेटाळला आहे.