आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीला मारहाण प्रकरणातील दोन पोलिस निलंबित, लालबागच्या दर्शनावेळी घडलेली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई; लालबाग राजाच्या दर्शनावेळी नंदिनी गोस्वामी तरुणीला मारहाण करणाऱ्या दोन महिला पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, नंदिनी त्यावेळी मद्यप्राशन करून होती, असा दावा निलंबित महिला पोलिसांनी केला आहे. तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र, तिची अरेरावी कायमच असल्याने नाईलाजास्तव आम्हाला तिला मारावे लागले. तिच्यावर वेळीच नियंत्रण मिळवले नसते तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असती,’ असा दावाही या पोलिसांनी माध्यमांशी बोलताना केला.
गणेश मंडळाला तीन लाखांचा दंड
लालबागचा राजा गणेश मंडळाला मुंबईच्या महापालिकेने ३ लाख ३६ रुपयांचा दंड ठोठावला आहे. या मंडळाने मंडपासाठी खड्डे खोदून ते पुन्हा न बुजवल्याबद्दल हा दंड ठाेठावण्यात आला.सन २०१२ पासून महापालिकेने या मंडळाला दंड ठोठावला असून त्याची रक्कम ३८ लाखांवर आहे. मात्र मंडळाने ही रक्कम भरलेली नाही.