आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Commits Suicide Because She Couldn't Bear Heavy Menstrual Bleeding

मुंबई: मासिक पाळीतील रक्तस्त्राव सहन न झाल्याने तरूणीची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उल्हासनगर भागातील शिवाजी परिसरातील एका 20 वर्षीय तरूणीने मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असल्याने व तो सहन होत नसल्याने आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. मासिक पाळीत होत असलेल्या रक्तस्त्रावामुळे व पोटातील दुखण्यामुळे ती वैतागली व त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. संबंधित तरूणीने सुसाईट नोट लिहली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनाली गव्हनेर असे या मुलीचे नाव आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाली एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आली होती. आर्थिक कारणामुळे तिला शाळेतूनही काढून टाकण्यात आले होते. तिची आई मोलकरीण म्हणून काम करते. त्यामुळे पैशांची कायमच चणचण भासायची. या सर्व कारणांमुळे सोनाली नैराश्य आले होते. त्यातच तिला मासिक पाळीदरम्यान प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे तिच्या पोटात दुखू लागले, वेदना होत होत्या. रविवारी सोनालीची आई व बहिण काही कामांसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्याचवेळी सर्व घटनांना वैतागून सोनालीने घरातच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेचा तपास करणा-या पोलिस उपनिरीक्षक एस एस साळुंखे यांनी सांगितले की, हे कुटुंब फारच गरीब आहे. तिच्या आईने सांगितले की, गरीबीमुळे शाळा सुटल्याने सोनाली निराश असायची. ती कोणाला फारशी बोलत नसे. त्यातच तिला मासिक पाळीदरम्यान पोटात दुखणे व जास्तीचा रक्सस्त्राव होऊ लागला. त्यामुळे ती चिडायची, रागवायची. या सा-या कटकटीतूनच निराश होऊन तिने आत्महत्या केली असावी.