आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Death On Bus Accident At Mumbai For Earphone

हेडफोनवर गाण्याची धुंदी; तरुणीला 3 बसने चिरडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- इअरफोनवर गाणे ऐकत रस्ता ओलांडणे निधी पांडे या बारावीत शिकणार्‍या 17 वर्षीय तरुणीच्या जिवावर बेतले. गाण्याच्या धुंदीत तिला वाहनांचा आवाज आणि अंदाज आला नाही. एकामागोमाग भरधाव तीन बसनी तिला चिरडले. दादर भागात ही हृदयद्रावक घटना घडली.

अँटॉप हिल भागात ती राहत होती. सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिममधून परतताना इअरफोनवर गाणी ऐकतच निधी वर्दळीचा रस्ता ओलांडत होती. गाण्यांच्या नादात तिला मागाहून येणार्‍या वाहनाचा आवाज किंवा त्याच्या वेगाचा अंदाज आला नाही. एका बसने तिला चिरडले. पाठोपाठ आलेल्या दोन बस निधीला चिरडत निघून गेल्या. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या या तरुणीला रुग्णालयात हलवण्याची तसदीही कुणी घेतली नाही. शेवटी एका कारचालकाने पोलिसांना कळवले. पोलिस येईपर्यंत ती तशीच पडून होती. तिला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोवर वेळ निघून गेली होती. निधीला चिरडून जाणार्‍या पहिल्या बसच्या चालकास पोलिसांनी अटक केली आहे. निधी बारावीत होती. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तिला 85 टक्के गुण मिळाले होते.

आठवड्यातील दुसरी घटना
इअरफोनच्या धुंदीत जीव गमावण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मोबाइल हेडफोनवर गाणी ऐकत रूळ ओलांडणार्‍या एका तरुणाचा कासजंग-फरुखाबाद पॅसेंजर रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला होता. मृत तरुण बीटेकचा विद्यार्थी होता.