आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींच्या स्वसंरक्षणासाठीचा निधी पडून; यूपीए सरकारने काढून घेतला निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे म्हणून राज्याच्या ग्रामीण भागातील नववी ते 12 वीतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची योजना आखण्यात आली होती. केंद्र सरकारने यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता, परंतु राज्यातील आघाडी सरकारने हा पैसा खर्चच केला नाही. त्यामुळे यूपीए सरकारने हा निधी परत घेतल्याची नामुष्की राज्यावर ओढवल्याचे उघडकीस आले आहे.

केंद्र सरकारने राष्‍ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी सर्व राज्यांना निधी दिला आहे. अत्याचारापासून प्रतिकार करता यावा यासाठी याच निधीतून राज्यातील नववी ते 12 वीच्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने हाती घेतले होते. राज्यातील 1375 शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये नववी ते 12वी पर्यंत शिकणार्‍या सुमारे 13 लाख विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या प्रशिक्षणासाठी यूपीए सरकारने गेल्या वर्षी 432.36 लाख निधी दिला होता.

अधिकार्‍यांची निष्काळजी
केंद्राच्या निधीतून जिल्हा व तालुका पातळीवर ज्युदो, कराटे व तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जात होते. मात्र, शिक्षणाधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे गेल्या वर्षी 23 जिल्ह्यातील फक्त 96 081 विद्यार्थिनींनाच प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी 254.93 लाख खर्च झाला. मात्र अन्य जिल्ह्यांमध्ये मुलींच्या स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणावर लक्षच देण्यात आले नाही.