आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: अपघातानंतर रस्त्यावर पडली होती तरूणी, एका व्यक्तीने केले हे लाजीरवाणे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाईकस्वराने धडक दिल्यानंतर हीच अनन्या रस्त्यावर बेशुद्ध पडली होती. - Divya Marathi
बाईकस्वराने धडक दिल्यानंतर हीच अनन्या रस्त्यावर बेशुद्ध पडली होती.
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका 17 वर्षाची कॉलेज तरूणी अनन्या गायतोंडे एका अपघातानंतर रस्त्यावर पडली होती. त्यावेळी लोक उभा तमाशा पाहत बसले पण कोणी मदतीला धावले नाही. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा गर्दीतील एक व्यक्ती आला आणि त्याने मदत करायची सोडून तिचा मोबाईल घेऊन फरार झाला. काही वेळाने दोन महिलांनी या तरूणीला रस्त्यावर पडलेले पाहिले आणि तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. या घटनेनंतर तरूणीच्या वडिलाने आपला राग व्यक्त करत फेसबुकवर घडलेली कहाणी पोस्ट केली. काय लिहले फेसबुकवर...
 
- अनन्याचे वडिल विश्वनाथ गायतोंडे यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहले की, "काल माझी मुलगी एका अपघातात सापडली. एका वेगाने धावणा-या दुचाकीस्वाराने दुपारी 2.45 च्या सुमारास अंधेरीतील 4 बंगला सिग्नलजवळ धडक दिली. माझी मुलगी खूप वेळ तेथेच बेशुद्ध पडून राहिली. मात्र तिच्या मदतीला कोणी आले नाही. एक व्यक्ती गर्दीतून पुढे आला आणि तिचा मोबाईल चोरून घेऊन गेला."
 
- पुढे लोकांवर नाराजी व्यक्त करून विश्वनाथने लिहले की, "बाकी लोक चुप-चाप उभे होते. मात्र,  माझी 17 वर्षाच्या मुलीचा लोक तमाशा पाहत बसले. काही लोकांनी त्या संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात परमेश्वराच्या कृपेने दोन महिलांनी (एक आई आणि मुलगी) ऑटो करून रूग्णात पाठवले. त्यांनी माझ्या मुलीला मदत करण्याचा प्रयत्न केला पण काहींना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. जे फारच धक्कादायक आहे.''
 
- त्या मायलेकीचे कौतूक करून विश्वनाथने पुढे लिहले की, "त्या दोघींनी इतरांचे म्हणणे न ऐकता माझ्या मुलीच्या चेह-यावर पाणी मारले. या घटनेनंतर माझी मुलगी बराच वेळ बेशुद्ध झाली होती. महिलांनी तिची बॅग शोधली आणि त्यात माझा नंबर सापडल्यानंतर मला फोन केला."
 
- फेसबुकवर पुढे विश्वनाथ लिहतात की, "या घटनेनंतर त्या मायलेकीनी माझ्या मुलीला त्यांच्या घरी नेले. जोपर्यंत मी तेथे पोहचलो नाही तोपर्यंत तिची काळजी घेतली. मी तेथे पोहचलो आणि मुलीला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथील डॉक्टर्सनी सांगितले की, मुलगी धोक्याच्या बाहेर आहे. तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला."
 
मुंबई पोलिसांना आवाहन केले त्या मोबाईल चोराला पकडण्याचा- 
 
- फोन चोरी केल्यानंतर नाराजगी होत विश्वनाथ म्हणाले, आपण कसल्या शहरात राहत आहे. अशा स्थितीत फोन चोरी करावा असे एखाद्याला कसे काय वाटते. जर तिचा फोन तिच्याजवळ असता तर एक तास आधीच माझी मुलगी रूग्णालयात पोहचली असती.

- पुढे ते लिहतात की, मुंबई पोलिसांना मी आवाहन करतो की, माझ्या मुलीला धकड देणारा दुचाकीस्वार आणि फोन चोरणारा लवकरात लवकर पकडला जावा."

- ते म्हणतात, "मला माहित आहे की, मुंबई आज सुद्धा काही चांगल्या लोकांमुळेच जीवंत आहे."

- फेसबुकवर विश्वनाथ यांनी लिहलेली ही कहानी खूपच व्हायरल होत आहे. या घटनेचा निषेध करण्यासोबतच आरोपींना लवकरात लवकर पकडण्याबाबत लोक बोलत आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विश्वनाथ आणि त्यांची मुलगी अनन्याचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...