आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिकार्‍याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या; बेळगावात फेकला मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकलेश पाटील (24) व अक्षय वालोदे (25) अशी आरोपींची नावे आहेत. - Divya Marathi
निकलेश पाटील (24) व अक्षय वालोदे (25) अशी आरोपींची नावे आहेत.
मुंबई/नागपूर- नागपूर येथील असिस्टेंट पोलिस इन्स्पेक्टरच्या (API) मुलीवर तिच्या दोन बालमित्रांनी अंबरनाथ येथे सामुहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. नराधम हत्या करून थांबले नाहीत तर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले आणि ते अंबरनाथपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेळगाव (कर्नाटक) येथील झुडपात फेकले.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना रत्नागिरीतून अटक केली आहे. दोघांनी गुन्हा कबुल केला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकलेश पाटील (24) व अक्षय वालोदे (25) अशी आरोपींची नावे आहेत.

मुंबईत कॉल सेंटरमध्ये जॉब करत होती तरुणी..
- मृत तरुणी मुंबईत कॉल सेंटरमध्ये जॉब  करत होती.
- तरूणीला अंबरनाथ पूर्व येथील पालेगाव परिसरात तिच्या बालमित्रांनी पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावले.
- दोघांनी तिच्यावर अाळीपाळीने सामुहिक अत्याचार करून ती या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करेल या भीतीने तिला जीवेठार मारून तिचे प्रेत बॅगेत भरून बेळगावच्या हद्दीत फेकून दिले.
- पण गुन्हयात ती चार चाकी गाडी वापरली होती त्या गाडीच्या चालकामुळे हा खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... मित्रांनीच तिच्यावर केला आळीपाळीने अत्याचार
बातम्या आणखी आहेत...