आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्‍लील चाळे करणार्‍या भामट्याला तरुणीने शिकवला धडा, गचांडी पकडून केले पोलिसांच्या हवाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अश्लील चाळे करून छेड काढणार्‍या भामट्याला एका तरुणीने चांगलाच धडा शिकवला. इतकेच नाही तर त्याची गचांडी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवारी घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज‍िगरबाज तरुणीचे सगळ्यांकडून कौतुक होत आहे.

कल्याण स्टेशनवर पाहायला मिळाला थरार...
कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी रात्रीच्या सुमारास हा थरार पाहायला मिळाळा. तरुणी स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी उभी होती, तेथेच हा भामटा देखील उभा होता. त्याने या तरुणीला पाहात अश्‍लील चाळे करण्यास सुरुवात केली. तरुणीने सुरूवातीला त्याच्याकडे दूर्लक्ष केले. तरीचे त्याचे चाळे करणे सुरुच होते. हे पाहून तरुणी भडकली. तिने या टपोरीच्या कानशिलात भडकावल्या. त्याची गचांडी पकडून त्याला पोलिसांच्या हवाले करण्‍यात आले.

तरुणीच्या तक्रारीनुसार, कल्याणच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात टपोरीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र लालबहादूर गौतम (30) असे आरोपीचे नाव आहे.

स्टेशनवर सगळे पाहात होते परंतु मदत केली नाही...
कल्याण स्टेशनवर हा प्रकार सगळे पाहात होते. परंतु तरुणीच्या मदतीला कुणीही धावून आले नाही. मात्र, धाडस पाहून सर्वांनी तिचे कौतुक केले.

या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...