आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Teasing Complaint Against Salman Khans Brother

छेडछाड : तरुणीचा पाठलाग केल्याचा सलमानच्या आतेभावावर आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या आतेभावाने डॉक्टर तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुला मिर्झा खान असे त्याचे नाव असून, लग्नासाठी गेल्या दीड वर्षांपासून मानसिक त्रास देत आहे तसेच फेसबुक व ई-मेलवरून आपल्याबाबत अश्लील पोस्ट केल्याची तक्रार या तरुणीने केलेली आहे. सलमान खानच्या घरी त्याच्याशी ओळख झाल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.
ओशिवरा भागात राहत असलेली २५ वर्षांची ही तरुणी फूड एक्स्पर्ट व हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करते. गेल्या
वर्षी ती अभिनेता सलमान खानची सल्लागार म्हणून काम करीत होती. त्यानिमित्ताने सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी बिल्डिंगमध्ये जात असताना अब्दुला मिर्झा या त्याच्या नातेवाइकाशी तिचा परिचय झाला. तो मार्केटिंगचे काम करीत असल्याने त्याने तरुणीला तिच्या व्यवसायात मदत करण्याचे आश्वासन देत मैत्री केली. त्यानंतर गेल्या २९ मे रोजी त्याने आपल्या फ्लॅटमध्ये नेऊन लग्न करण्याची मागणी केली. मात्र, तिने नकार देताच मुंबईत राहू देणार नाही, तुझी बदनामी करू, असे धमकावले, तर ५ जूनला भेटण्यास येऊन लॅपटॉप तोडला.
त्यानंतर वारंवार फोन, ई-मेलवर मॅसेज व व्हॉट्सअॅप करून लग्न करण्यासाठी धमकावत होता. १० सप्टेंबरला आपल्या अपार्टमेंटजवळ येऊन अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर १९ सप्टेंबरला तिचे फेसबुक व ई-मेल खाते हॅक करून त्यावर बदनामीकारक पोस्ट टाकल्या. अखेर संबंधित तरुणीने शुक्रवारी ओशिवरा पोलिस ठाण्यात अब्दुला मिर्झा खान याच्याविरुद्ध फिर्याद दिली. तरुणीची वकील अाभा सिंह यांनी सांगितले, 'हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे.' त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल
करण्यात आले आहेत.