आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत धावत्या एक्सप्रेसमधून मराठी तरुणीला बाहेर फेकले, थोडक्यात वाचला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेखावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. - Divya Marathi
रेखावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई- महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला विरोध करणाऱ्या तरुणीला रेल्वेतून बाहेर फेकण्याची घटना कल्याण ठाकुर्ली स्थानकादरम्यान घडली. सुदैवाने ही तरुणी सुखरूप असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेखा नवले असे जखमी तरुणीचे नाव आहे.

गुरुवारी संध्याकाळी गोरखपूर एक्स्प्रेसने महिला डब्यातून रेखा आणि सरिता या माय-लेकी नाशिकहून ठाणे येथे जात होत्या. याच डब्यात रिता यादव ही महिला आपल्या मुलांसह प्रवास करत होती. रिताचा पती दिनेश यादव हा शेजारील डब्यातून प्रवास करत होता. मात्र, प्रवासी दरम्यान एका स्थानकात रेल्वे थांबताच तो महिलांच्या डब्यात घुसल्याने इतर महिला प्रवाशांनी त्याला विरोध केला. त्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आले.

कल्याणमध्ये दिनेशने महिला प्रवाशांचा विरोध जुमानता पुन्हा अारक्षित डब्यात प्रवेश केला. रेल्वे कल्याण-ठाकुर्लीदरम्यान येताच एक महिला शौचालयात जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या दिनेशचा तिला धक्का लागल्याने सदर महिलेने त्याला जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या दिनेशने दरवाजात उभ्या असलेल्या रेखा हिला चालत्या गाडीतून ढकलून दिले. सुदैवाने या वेळी रेल्वेचा वेग कमी असल्यामुळे रेखाच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुढे वाचा, आरोपीला पोलिस कोठडी..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...