आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी तस्करीतून बाहेर पडलेल्या तरुणीची मोदींना राखी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मानवी तस्करीच्या दुर्दैवी चक्रातून बाहेर पडून आता नोकरी करत सन्मानाने जगणाऱ्या मुंबईतील एका तरुणीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवली. सोबतच पत्राद्वारे आपल्या, आपल्यासारख्या इतर मुलींच्या भावनाही पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्या आहेत. ‘तुम्ही आमचे भाऊ आहात, आज रक्षाबंधनाच्या दिवशी मी तुम्हाला विनंती करते की, अजूनही या दुष्टचक्रात अडकलेल्या इतर बहिणींना यातून बाहेर काढा’, अशा भावना तिने पत्रात व्यक्त केल्या आहेत. ही राखी रहाटकर यांनी मोदी यांना नुकतीच बांधली.   

मूळ कोलकाता येथील या तरुणीला फसवून मुंबईत आणण्यात आले होते. तस्करीला बळी पडलेल्या या तरुणीने ६ वर्षे यातना भोगल्या. मुंबई पोलिस आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तिची सुटका झाली. असामान्य धैर्य दाखवत नवे आयुष्य जगणाऱ्या या तरुणीचा नुकताच राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित महिला तस्करीबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी रक्षाबंधनाच्या दिनी दिल्लीत पंतप्रधानांना राखी बांधली. त्या वेळी या बहिणीचे पत्र व राखी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवली.  
बातम्या आणखी आहेत...