आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCTVमध्ये कैद झाले \'बंटी-बबली\'; गर्लफ्रेंड सिलेक्ट करायची बाइक; बॉयफ्रेंडसोबत व्हायची रफूचक्कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पालघर जिल्ह्यातील वसई येथे पोलिसांनी 'बंटी-बबली'ला जेरबंद केले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी शोरूममधून नव्या बाईक्स चोरणार्‍या दोन्ही भामट्यांच्या नांग्या आवळल्या. कॅमेर्‍यात कैद झालेले त्यांची कारनामे पाहून तर पोलिसही थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे, कोणती बाइक चोरायची याचे सिलेक्शन बबली करत होती. दोघांना पालघर कोर्टात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे हे प्रकरण?
- दीपेश पाटील आणि पूजा पाटील असे चोरट्या बंटी बबलीचे नाव आहे. दोघांना पोलिसांनी वसईतील मानिकपूर भागातून अटक केली आहे.
- शो रूममधील अनेक नव्या बाईक्स दोघांनी संगनमताने लांबवल्या आहेत. दोघे एकमेकांना पती-पती सांगून शो रुममध्ये जात होते. नंतर ट्रायलसाठी दोघे बाईकवर बसून रफूचक्कर होत होते.
- कोणती बाईक चोरायची याबाबत पूजा पाटील निर्णय घेत होती. नंतर बाईक विकून काही दिवसांसाठी फरार होत होते.

जाळ्यात असे अडकले आरोपी...
- दीपेश आणि पूजा काही दिवसांपूर्वी पालघर येथील हॉट व्हील नामक शो रूममध्ये गेले होते. बाईक खरेदी करायचे सांगून दोघांनी ट्रायल घेण्यासाठी गेले. पण बराच वेळ झाला तरी दोघे परत आले नाही.
- मात्र, दोघे शो-रूममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले. शोरूमच्या मालकाने व्हिडिओ फुटेजच्या आधारावर दोघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
- पोलिसांनी दोन्ही आरोपींचे फोटो परिसरातील पोलिस ठाण्यात पाठवले. गुरुवारी दोघे हीरोच्या शोरूममध्ये दोन हजार घेऊन  नवी बाईक बुक करण्यासाठी गेले असता पोलिसांनी दोघांना रंगेहाथ अटक केली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... बाईकचोर बंटी-बबलीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...