आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रूणहत्या मनुष्यवधाचा गुन्हा: कायद्यातील दुरुस्तीसाठी केंद्राकडे प्रस्ताव- आरोग्यमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील स्त्री भ्रूणहत्यांना आळा बसावा म्हणून 'पीसीपीएनडीटी' कायद्यात सुधारणा करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता यावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. आमदार मीरा रेंगे पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना त्यांनी यासंबंधीची शिफारस प्रस्तावाद्वारे केंद्राकडे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
परळी आणि सोलापूर येथील स्त्री भ्रूणहत्यांबाबत आमदार रेंगे पाटील यांनी सोनोग्राफी केंद्रांवर कारवाईचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना शेट्टी म्हणाले, पीसीपीएनडीटी कायद्यानुसार राज्यात 291 सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. परळीतील डॉक्टर मुंडे दांपत्याविरुद्ध कारवाई सुरू असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
स्त्री भ्रूणहत्येसंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करून मनुष्यवधाच्या गुन्ह्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. ही बाब केंद्राच्या अखत्यारीत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. कोल्हापूर येथील सोनोग्राफी केंद्रामध्ये सायलेंट ऑब्झर्व्हरमध्ये फेरफार केल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.
एमआरवरही कारवाई- स्त्री भ्रूणहत्येसंबंधी काद्यातील दुरुस्तीबाबत केंद्राचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. शिवाय गर्भनिरोधक गोळ्या आणि संबंधित सामग्री विकणार्‍या एमआरवरही कारवाई केली जाणार आहे.- सुरेश शेट्टी, आरोग्यमंत्री.
एकीकडे स्त्री भ्रूणहत्या, दुसरीकडे जगवण्याची शर्थ
स्त्री-भ्रूणहत्या: मानसिकतेत बदल करावा, स्मिता वाघ यांचे आवाहन
कळ्यांचे कर्दनकाळ टॉक शो : धाडसत्राने भ्रूणहत्या थांबणार काय?
स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यात प्रशासन कुचकामी ठरल्याची सरकारची कबुली