आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थिनींना शाळांत मिळणार कराटे प्रशिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक महिला दिनी राज्याचे महिला धोरण जाहीर करण्याचे राज्य सरकारने ठरवले असून त्याचा मसुदाही तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महिला आणि बाल विकास विभागाने तयार केलेल्या नव्या मसुद्यात राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींना कराटेचे प्रशिक्षण द्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

महिला व बालविकास विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1994 मध्ये राज्यातील महिलांच्या विकासासाठी पहिले महिला धोरण जाहीर केले. त्यानंतर 2001 मध्ये राज्याने दुसरे धोरण जाहीर केले. प्रत्येक तीन वर्षांनंतर त्याचा पाठपुरावा करणे व पुन्हा नवीन महिला धोरण जाहीर करण्याची तरतूद करण्यात आली होती, परंतु असे झालेच नाही. त्यामुळे आता बारा वर्षांनंतर राज्याचे तिसरे महिला धोरण जाहीर होत आहे.

शाळा व महाविद्यालयांमध्ये मुलींच्या प्रमाणात स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्येक शैक्षणिक संस्थामध्ये मुलींसाठी वेगळी रूम आणि सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणेही नव्या मसुद्यात बंधनकारक करण्यात आले आहे.