आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girls, Women Safety Issue In Mumbai, Comment Shilpa Shetty

महिला, तरुणींनी स्वरक्षणासाठी पर्समध्ये चाकू बाळगावेत; शिल्पा शेट्टीचे रोखठोक मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- स्वत:चे रक्षण करण्यासाठी महिला व तरुणींनी स्वत:जवळ कायम चाकू बाळगून अत्याचार करणार्‍याला धडा शिकवावा, असा सल्ला अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने मुंबईत एका कार्यक्रमात दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी विलेपार्ले येथील भाईदास हॉल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिल्पाला खासकरून आमंत्रित करण्यात आले होते. शिल्पा म्हणाली, काही दिवसांपूर्वीच छायाचित्रकार तरुणीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. काही लोक नासक्या डोक्याचे असतात. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे लोक तरुणी आणि महिलांवर बलात्कार आणि
विनयभंगासारखे प्रकार करतात.

गर्दीच्या ठिकाणी तर अनेकदा महिलांचा विनयभंग होतो. मात्र, बदनामीच्या भीतीने त्या काहीही बोलत नाहीत. पोलिस महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहेतच. मात्र, ते कुठे कुठे लक्ष देणार? त्यामुळे महिलांनी गर्दीच्या ठिकाणी आणि एकटे बाहेर पडताना स्वत:जवळ चाकू बाळगून अत्याचार करणार्‍याला धडा शिकवावा. अलीकडे वृत्तपत्रांतून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना वाचनात येतात. त्यामुळे आपण कोणत्या समाजात राहतो याचा प्रश्न पडतो, असेही ती म्हणाली.

पोलिसांचे काम अवघड
पोलिसांचे काम अतिशय अवघड आहे. ते दिवसरात्र आपल्या सुरक्षेची काळजी घेत असतात. त्यामुळे त्यांची लोकांनी मदत केली पाहिजे. तसेच नागरिकांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत.