आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Dr.Kalam Name To Proposed Coastal Road Abu Azami

प्रस्तावित कोस्टल रोडला डॉ. कलाम यांचे नाव द्यावे, अबू अाझमींची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडला भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे, मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मंगळवारी केली आहे. वास्तविक, ३५ किलोमीटर लांबीच्या या मार्गाच्या श्रेयावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात आधीपासूनच वाद सुरू आहे.

या मार्गाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी आहे. याबाबत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी तीन आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या मार्गास बाळासाहेबांचे नाव दिल्यास देशविदेशातून येणा-या पर्यटकांना त्यांनी मुंबईसाठी दिलेल्या योगदानाची माहिती होईल, असे प्रभू यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आझमी यांनी केलेल्या मागणीमुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मागच्या महिन्यात केंद्रीय पर्यावरण खात्याने मुंबईतील या बहुचर्चित कोस्टल रोडला परवानगी दिली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली होती. तेव्हा, उद्धव ठाकरे यांचे स्वप्न भाजपने हायजॅक केल्याची चर्चा गाजली होती. कारण, या मार्गाचा विषय सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांनी मांडला होता. अशातच या मार्गाला डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची मागणी करत अबू आझमींनी नवा वाद सुरू केला आहे. दरम्यान, या मागणीसाठी आपण याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचेही आझमी यांनी म्हटले आहे.