आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Evidence Of Dabholkar Murder, Vinod Tawade Demands To Raj

दाभोलकरांच्या हत्येचे पुरावे द्यावेत, विनोद तावडे यांची राज यांच्याकडे मागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या शासन पुरस्कृत असल्याचा आरोप एका पक्षप्रमुखाने केला आहे. पुरावे असल्याशिवाय ते बोलणार नाहीत, त्यांनी तपास यंत्रणांना पुरावे द्यावेत, अशी मागणी भाजपचे नेते विनोद तावडे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. तावडे म्हणाले, एक महिना झाला तरी दाभोलकरांचे मारेकरी सापडले नाहीत. यावरून तपास यंत्रणांचेच हे अपयश आहे. त्यामुळे आता तपास एनआयएसारख्या संस्थेकडे सोपवावा.


मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. आदर्श समितीचा अहवाल सरकारने विधिमंडळात ठेवावा. फक्त सभापतींना दिल्यास आम्ही ते मंजूर करणार नाही, असेही ते म्हणाले.