आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाडत, उपकरातून शेतकरी सुटणार - सहकारमंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/औरंगाबाद - भाजीपाला व फळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून मुक्त करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. लवकरच त्याचा अध्यादेश काढला जाईल. अाडत व उपकरासारख्या करांमधून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. त्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात दुरूस्ती विधेयक मांडण्यात येईल, अशी माहिती सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. ते म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंना बाजार समितीतून (एपीएमससी) मुक्त करण्याची सूचना केंद्राने केल्यानंतर काही राज्यांनी या वस्तू नियमनातून बाहेर काढल्या. शेतकऱ्यांना थेट विक्रीची मुभा देताना त्यात पुन्हा व्यापारी, दलालांचे फावणार नाही याचीही काळजी घेऊ. आपल्या वस्तू थेट ग्राहकांना विकायचीही परवानगी शेतकऱ्यांना दिली जाईल.
मुंबई बाजार समितीत सध्या जो शेतमाल येतोय, तो खरेदीदार व्यापाऱ्यांचा आहे. नियमनमुक्त धोरण आणल्याने शेतकरी मुंबईच्या नाक्यानाक्यांवर फळे-भाजीपाला थेट ग्राहकांना विकतील, असे समजणे निव्वळ खुळेपणा असल्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत्यांचे मत आहे.
नियमनमुक्तीच्या धोरणास आमचा विरोध नाही, मात्र यातून शेतकऱ्यांचा आिण ग्राहकांचा काहीही फायदा होणार नाही, अशी भूमिका आडते, व्यापारी आिण माथाडी कामगारांनी ‘दिव्य मराठी’कडे मांडली. आडत व्यापारी सर्जेराव यादव म्हणाले, इथं येणारा ९० टक्के माल व्यापारी खरेदीदारांचा आहे. शेतमाल नियमनमुक्तीचा निर्णय खुळेपणाचा आहे. या धोरणाचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही. मध्यस्थ काढला तर शेतमालाच्या पैशाची जबाबदारी कोणाची? शेतमाल खपला नाही तर आम्ही पट्टी करून देतो. तेजीत शेतकरी विकतील हो, मंदीत काय करणार? असा सवाल चंद्रशेखर कामठे या अाडत्यांनी केला.
शेतकरी म्हणतात...
खुल्या बाजारात ग्राहकांचे हित साधले जाईल, परंतु शेतकऱ्यांचे संरक्षण, भाव कसे ठरणार, मालाची हमाली, मापाई कशी व कोण करणार अशा अनेक समस्या उद्भवणार आहेत.
-गजानन मोहोड (अमरावती)

राज्यात सर्वत्र एकच आडत आणि मार्केट फी करावी. तसेच सध्याच्या मार्केट फी आणि आडतमध्ये निम्म्याने घट करावी.
- बाळासाहेब म्हैसधुणे (नाशिक)

शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना एकदम उत्तम असून यातून शेतकऱ्यांचे हित साध्य होईल. यामुळे कृषीमालास योग्य भाव मिळून आडते व खरेदीदार यांच्याकडून होणारी पिळवणूक थांबेल.
- विश्वनाथ पाटील (सोलापूर)
पुढे वाचा...
> शेतकरी हित दुर्लक्षितच : गिरधर पाटील
> अन् अांध्रचा रयतू बाजारही बिघडला...
> यंत्रणा उभी करूनच थेट विक्री
बातम्या आणखी आहेत...