आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Holiday Within Seven Day ,if Not Crime On Atrocity

विद्यार्थ्याला सात दिवसांत पगारी सुटी न दिल्यास ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘मुंबई महापालिकेच्या सफाई खात्यात रात्री काम करून दिवसा उच्च शिक्षण घेणा-या एका मागासवर्गीय विद्यार्थ्याला 7 दिवसांत पगारी सुटी देण्याचा निर्णय घ्या, अन्यथा या विद्यार्थ्याचा छळ केल्याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल’, अशा शब्दांत राष्‍ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजकुमार वरका यांनी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची सोमवारी कानउघाडणी केली.
सुनील लक्ष्मण यादव हा उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी महापालिकेच्या ‘ड’ वॉर्डात सफाई कामगार म्हणून काम करतो. एमबीएचे शिक्षण पूर्ण करून सध्या तो टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत ‘एम.ए. ग्लोबलायझेशन अँड लेबर’ या विषयाचे शिक्षण घेत आहे. हा अभ्यासक्रम पूर्णवेळ असल्यामुळे दिवसा शिक्षण आणि रात्री काम असा त्याचा शिरस्ता होता.
दरम्यान, मागासवर्गीय कर्मचारी उच्च शिक्षण घेत असतील तर त्यांना पगारी सुट्या देण्याचा नियम असल्याचे यादव याला समजले. त्यानुसार यादव याने महापालिकेच्या अधिका-यांकडे अर्ज केला. मात्र, असा कोणताही नियम नसून एकट्याला परवानगी दिली तर अन्य कर्मचा-यांनाही द्यावी लागेल, असे उत्तर त्याला देण्यात आले. आपली
हक्काची सुटी मिळत नसल्यामुळे यादव यांनी राष्‍ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाकडे पत्र पाठवून याबाबत तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजकुमार
वरका यांनी आज सुनावणी घेतली.