आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Give Information About Chief Minister Quta Flat Information, High Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्‍यमंत्री कोट्यातील फ्लॅटची माहिती द्या, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री कोट्यातून एक किंवा त्यापेक्षा अधिक फ्लॅट मिळवणा-या व्यक्तींच्या नावाची यादी सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी दिले. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने शहरी विकास विभागाला सदर यादी 20 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेशही दिले. पत्रकार केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. पत्रकार आणि राजकीय व्यक्तींना मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट देण्याची तरतूद आहे. मात्र, याउलट धनाड्य व्यक्तींना या कोट्यातून फ्लॅट वितरित करण्यात आल्याचा आरोप तिरोडकर यांनी याचिकेत केला आहे.