आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलचे 500 कोटी दुष्काळग्रस्तांना द्याः शिवसेनेची मागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'आयपीएल'च्या माध्यमातून मिळणारी रक्कम दुष्काळग्रस्तांना द्यावी, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा सामन्यांना परवानगी देऊ नये. असे न झाल्यास शिवसेना बघून घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आयपीएलच्या माध्यमातून 500 कोटींच्यावर निधी जमा होतो. तो दुष्काळ निवारणासाठी दिल्यास जनतेला दिलासा मिळू शकेल. आयपीएलचे सामने खेळवण्यास विरोध नाही. मात्र मोठे उद्योगपती, फिल्मस्टार्स यांच्या मालकीच्या आयपीएल टीम आहेत आणि त्यातून त्यांना मोठा नफा मिळतो. त्यांनी सामाजिक बांधिलकीपोटी दुष्काळग्रस्तांना मदत करावी, असे ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी दुष्काळामुळे 'आयपीएल'ला विरोध केला होता.

'एअर इंडिया'चे मुख्यालय हलविल्यास आंदोलन- एअर इंडियाचे मुंबईतील मुख्यालय दिल्ली येथे हलवल्यास एकही विमान उडू देणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. नागरी उड्डाणमंत्री अजित सिंग यांनी रविवारी एअर इंडियाचे मुंबईतील मुख्यालय दिल्ली येथे हलवण्याबाबत सूतोवाच केले होते. त्यावर शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.